Hanuman Aarti in Marathi: No words can describe the powers and greatness of Ram Bhakt Hanuman. He is undoubtedly superior and a great devotee by faith of Lord Ram. Sing this famous Marathi Hanuman Aarti. In this lyrics article you can read Hanuman Aarti Marathi Lyrics, with English Lyrics from category aarti lyrics. Satrane Uddane – Maruti chi Aarti in Marathi
Bhagwan Hanuman Ji Ki Aarti in Marathi
या पोस्टमध्ये तुम्हाला Hanuman Aarti Marathi Lyrics, English Lyrics सोबत aarti या श्रेणी तुन मोफत ऑनलाइन मिळेल.. श्रीमारुतीची आरती सत्राणें उड्डाणें
Satrane Uddane – Maruti chi Aarti in Marathi
श्री मारुतीच्या आरत्या
सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।
करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनीं ।
कडाडिलें ब्रह्मांड धोका त्रिभुवनीं ।
सुरवर, नर, निशाचर* त्या झाल्या पळणी ।। १ ।।
जय देव जय देव जय जय हनुमंता ।
तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता ।। धृ० ।।
दुमदुमिले पाताळ उठला पडशब्द ।
धगधगिला धरणीधर मानिला खेद ।
कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।
रामीं रामदासा शक्तीचा शोध ।। २ ।।
आरतीमधील कठीण शब्दांचा अर्थ
‘सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं ।’ यामधील ‘सत्राणे’ म्हणजे आवेशाने.
‘तुमचेनि प्रतापे न भिये कृतान्ता’ यामधील ‘कृतान्त’ याचा अर्थ मृत्यू.
‘धगधगिला धरणीधर मानिला खेद’ याचा अर्थ हनुमानाचे सामर्थ्य पाहून शेषनागही मनात चरफडला आणि खेद पावला.
‘कडाडिले पर्वत उडुगण उच्छेद ।’ या ओळीतील ‘उडुगण’ म्हणजे नक्षत्रलोक.
‘रामीं रामदासा शक्तीचा शोध ।’ याचा अर्थ रामाशी एकरूप झालेल्या, अशा मारुतीच्या ठिकाणी समर्थ रामदासस्वामींना शक्तीचा स्रोत सापडला.

हनुमंताची आरती
हनुमंताची आरती: मित्रांनो आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Hanuman Aarti Marathi मध्ये
जय देवा हनुमंता । जय अंजनीसुता ॥
ॐ नमो देवदेवा । राया रामाच्या दूता ॥
आरती ओवाळीन । ब्रह्मचारी पवित्रा ॥ ध्रु० ॥
वानरूपधारी । ज्याची अंजनी माता ।
हिंडता वनांतरी । भेटी झाली रघुनाथा ॥
धन्य तो रामभक्त । ज्याने मांडिली कथा ॥ जय० ॥ १ ॥
सीतेच्या शोधासाठीं । रामे दिधली आज्ञा ॥
उल्लंधुनी समुद्रतीर । गेला लंकेच्या भुवना ॥
शोधूनी अशोकवना । मुद्रा टाकिली खुणा ॥ जय० ॥ २ ॥
सीतेसी दंडवत । दोन्ही कर जोडून ॥
वन हे विध्वंसिले । मारिला अखया दारुण ।
परतोनी लंकेवरी । तवं केले दहन ॥ जय० ॥ ३ ॥
निजबळे इंद्रजित । होम करी आपण ॥
तोही त्वां विध्वसिला । लघुशंका करून ॥
देखोनी पळताती । महाभूते दारुण ॥ जय० ॥ ४ ॥
राम हो लक्षुमण । जरी पाताळी नेले ॥
तयांच्या शुद्धीसाठी । जळी प्रवेश केले ॥
अहिरावण महिरावण । क्षणामाजि मर्दिले ॥ जय० ॥ ५ ॥
देउनी भुभुःकार । नरलोक आटीले ॥
दीनानाथ माहेरा । त्वां स्वामिसी सोडविले ॥
घेऊनी स्वामी खांदी । अयोध्येसी आणिले ॥ जय० ॥ ६ ॥
हनुमंत नाम तुझे । किती वर्णू दातारा ॥
अससी सर्वांठायी । हारोहारी अम्बरा ॥
एका जनार्दनी । मुक्त झाले संसारा ॥ जय० ॥ ७ ॥
हनुमानाच्या व्रताचे नियम / Hanuman Puja Niyam
मंगळवारी हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तीला जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आणि भक्तांच्या जीवनात फक्त मंगळच असतो असे मानले जाते. परंतु हनुमानाच्या व्रताचे काही नियम आहेत जे पाळणे आवश्यक आहे.
- हनुमानाची पूजा सकाळी आणि संध्याकाळीच केली जाते.
- हनुमानाच्या पूजेमध्ये फक्त लाल रंगाच्या फुलांचाच वापर करावा.
- तुम्ही हनुमानाची पूजा करत असाल तर लक्षात ठेवा की नेहमी लाल धाग्याची वात बनवून दिवा लावावा.
- हनुमानाची साधना करताना ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. पूजेदरम्यान मनात कामुक विचार येऊ देऊ नका.
- मंगळवारी मांस आणि दारूचे सेवन करू नये.
- हनुमानाच्या पूजेमध्ये चरणामृतचा वापर करू नये.
- हे लक्षात ठेवा की महिलांनी हनुमानाच्या मूर्तीला अजिबात स्पर्श करू नये.
Sri Hanuman Aarti Lyrics in other languages: Hindi | English | Gujarati | Bengali | Marathi
Also Read:
Hanuman Chalisa | Hanuman Aarti | Lord Hanuman Mobile Wallpaper | 108 Hanuman Ji Name | 1000 Names of God Hanuman
Shri Hanuman Dwadash Naam Stotram